Dainik Maval News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती मावळ येथील सर्व महिला अधिकाऱ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. पवन मावळ विभागातील अतिदुर्गम चावसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोटमवाडी या आदिवासी वस्तीवरील महिलांचा सन्मान करण्याचे नियोजन अधिकारी महिला वर्गाने केले होते.
अतिदुर्गम डोंगरी भागात राहणाऱ्या आदिवासी वस्तीवर जाऊन पंचायत समितीतील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या व्यथा जवळून समजावून घेतल्या. यानंतर येथील महिलांचा सन्मान करून महिला व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांना दैनंदिन उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली.
- यावेळी शिक्षण विस्तारधिकारी शोभा वहिले, अधीक्षक कविता पाटील, अर्थविभाग प्रमुख दिपा साखरे, कृषी विस्ताराधिकारी उज्वला बोराटे, केंद्र प्रमुख सुनंदा दहितूले, विलमा बार्देशकर, सुनिता देशमुख, कोमल विरणक, शकुंतला मोरमारे, अनिता शिंदे, आशा भोसले, सुनीता भोईर, नयना नाईक, सुनिता देशमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोटमवाडीचे मुख्याध्यापक राजनकुमार पवार यांनी केले. गोरख जांभूळकर, शंकर रणदिवे, मारूती ठोंबरे, संदीप चौधरी, राहूल वाकचोरे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन राहुल वाकचौरे यांनी केले, तर आभार अंकुश येवले यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News