व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दगडी गोटी उचलण्याच्या खेळात नवा विक्रम ! नितीन म्हाळसकर यांच्या रेकॉर्डब्रेक 321 बैठका, कुमार गटात विराज वाघवले प्रथम

यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 16, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Vadgaon Maval Historical Stone Lifting Competition 2025 Nitin Mhalaskar wins

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धुलिवंदनच्या दिवशी वडगाव मावळ येथे झालेल्या दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी ३२१ बैठका मारून गतवर्षी सौरभ ढोरे याने केलेला २८५ बैठकांचा विक्रम मोडून नवा विक्रम केला. दरम्यान कुमार गटात विराज वाघवले याने ३०१ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला तर तेजस भिलारे याने १०१ बैठका मारून वरिष्ठ गटात दुसरा क्रमांक पटकावला.

  • तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त गणेशअप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, पोलिस निरीक्षक कुमार कदम, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अतिश ढोरे, जय बजरंग तालीम अध्यक्ष उमेश ढोरे आदींच्या हस्ते शिवप्रतीमा पूजन व गोटी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी, बाळासाहेब ढोरे, बाबुराव वायकर, विठ्ठलराव भोसले, पंढरीनाथ ढोरे, मनोज ढोरे, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी, कुमार गटात देवेश पाटील याने ६१ बैठका मारून विराज ढोरे याने ५१ बैठक मारून तिसरा क्रमांक पटकावला. यशराज चव्हाण याने ५० बैठका, तुषार नवघणे याने ५० बैठका, यश ओझरकर याने ३७ बैठका, विनीत वहिले याने ३५ बैठका मारल्या. वरिष्ठ गटात पांडुरंग नवघणे याने ३३ बैठका मारून तिसरा क्रमांक पटकावला तर आदित्य आगळमे याने ३२ बैठका मारल्या. याशिवाय मदन भिलारे व सचिन ढोरे यांनी गोटी हातावर धरून अनोखा प्रयत्न केला.

  • जय बजरंग तालीम मंडळा च्या वतीने स्व. पै.केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने चांदीचे कडे व राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विनायक लोकरे, किरण म्हाळसकर यांच्यासह उपस्थितांनी इनाम म्हणून रोख बक्षीस दिले. तसेच कुमार व वरिष्ठ गटातील विजेत्यांना अनुक्रमे अरुण वाघमारे, सुनील दंडेल, अशोक घुले, विकी म्हाळसकर, अमित मुसळे, अतुल ढोरे यांच्या वतीने चषक देण्यात आले तर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. जय बजरंग तालीमच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ यांच्यासह कुस्तीगीर क्षेत्रातील नामवंत पैलवान चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, तानाजी काळोखे, राजाराम पाटील, केतन घारे, भक्ती जांभूळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील चव्हाण व विकी म्हाळसकर यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News


Previous Post

कुठलाही नवीन बनविलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकला पाहिजे… आमदार सुनील शेळके यांचे परखड मत

Next Post

कोटमवाडी चावसर येथील आदिवासी महिला व विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी वस्तूंची भेट । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gift of daily useful items to tribal women and students of Kotamwadi Chavasar Maval

कोटमवाडी चावसर येथील आदिवासी महिला व विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी वस्तूंची भेट । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.