कशाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला युवा स्वयंसेवक संघटना, पॉली कॅप कनेक्शन जिंदगी का, थिंक शार्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्यासाठी 55 इंची स्मार्ट टीव्ही आणि लायब्ररीसाठी 200 पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. पुस्तकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक ज्ञान, स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी आणि शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी थिंक शार्प फाउंडेशनचे अमित कुतवळ, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती नवनाथ जाधव, मुख्याध्यापक मुस्तुद सर, मोरे सर, शालेय व्यवस्थापन समिती संचालक तुकाराम जाधव, नितीन जाधव, रामदास जाधव, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया मंगेश जाधव, औटी मॅडम, मोदी मॅडम, इंगळे मॅडम, विद्यार्थी उपस्थित होते.
स्मार्ट टीव्ही आणि पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल यंग व्हॉलेंटर ऑर्गनायझेशन, पॉलिकॅब कमेक्शन झिंदगी का, थिंक शार्प फाउंडेशन यांचे शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद. ( Gift of Smart TV and 200 books to Zilla Parishad School in Kashal Maval )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
– अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचे रसायन जप्त