Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि गोरे सर सैनिक स्कूल मार्गदर्शन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला मुरलीधर गोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू गजानन गोरे यांच्यातर्फे शनिवारी (दि.7) नवीन समर्थ विद्यालयास वाॅटर फिल्टर भेट देण्यात आला. याप्रसंगी यादवेंद्र खळदे व नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश कार्ले उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ तळेगावला 35 वर्षे पूर्ण झाले असून क्लबने आजवर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे म्हणून हा उपक्रम केला आहे. मुलांनी त्याचा योग्य वापर करावा व स्वच्छता राखावी, असे यादवेंद्र खळदे म्हणाले.
कमलेश कार्ले यांनी नवीन समर्थ विद्यालयास पुढील काळात सोलर सिस्टिम देण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच समुपदेशन व संमोहन तज्ज्ञ दत्तात्रय गोरे यांनी मुलांसाठी अभ्यास व परीक्षेसाठी आवश्यक असणारे मेडीटेशन व संमोहन सेशन देण्याचा मनोदय व्यक्त केला.
याप्रसंगी प्रमोद दाभाडे, धनंजय मथुरे, चैतन्य कासार, देवेंद्र कदम, निलेश कुमार वाकचौरे, गिरीश जोशी, नवनाथ राठोड, दीपक सूर्यवंशी, ओंकार साळोखे, किरण पवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महेशभाई शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या वासंती काळोखे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुनील बोरुडे यांनी केले तर पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News