मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे (रविवार, 4 डिसेंबर) एका नाग जातीच्या जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. वारंगवाडी येथील रोहिदास वारिंगे यांच्या घरी रात्रीच्या वेळी कोंबड्यांच्या खुराड्याला लावलेल्या जाळीत एक नाग अडकला होता. ( Give Life To Cobra Snake By Sarpamitra Of Wildlife Conservation Society At Warangwadi Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
वन्यजीव रक्षक संस्थेचे सर्पमित्र प्रशांत भालेराव, गणेश सोंडेकर, रोहित दाभाडे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जात नागाला यशस्वीरित्या रेस्क्यू केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. प्रशांत भालेराव, गणेश सोंडेकर आणि रोहित दाभाडे या सर्पमित्रांचे ग्रामस्थांनी कौतूक केले.
अधिक वाचा –
– इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक घटना
– पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 7 डिसेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन । Ferfar Adalat