व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ग्लास स्कायवॉक’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर, ‘पीएमआरडीए’ उभारणार पर्यटन प्रकल्प ; निविदा प्रक्रिया सुरू । Glass Skywalk At Lonavala

लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या 'ग्लास स्कायवॉक' प्रकल्पाच्या मार्गातील जवळपास सर्वच अडथळे आता दूर झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
glass-skywalk-project-lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्लास स्कायवॉक’ (Glass Skywalk At Lonavala) प्रकल्पाच्या मार्गातील जवळपास सर्वच अडथळे आता दूर झाले आहेत. तसेच या प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे लवकरत पुणे जिल्ह्याच्या पर्यटनस्थळामध्ये नव्या पर्यटनस्थळाचा समावेश होणार आहे.

पर्यटननगरी लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत नुकतीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लोणावळा जवळील ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.

  • लोणावळा परिसरातील निसर्गसंपदा लक्षात घेता येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी व साहसी खेळ सह इतर सुविधांचा समावेश असलेला ‘ग्लास स्कायवॉक’ उभारावा. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करावे, अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत दिल्या होत्या.

पर्यटन विभागाने प्रकल्पासाठी असमर्थतता दर्शविली. त्यामुळे अजित पवार यांनी पर्यटन विभागाऐवजी ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) या प्रकल्पाचे काम हाती घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाची मान्यता घेऊन आराखडा तयार केला. त्याला पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. ( glass skywalk project near Lonavala will be constructed by PMRDA Tender process started )

ग्लास स्कायवॉक प्रकल्पाविषयी
– टायगर पॉइंट व लायन्स पॉइंट येथील प्रस्तावित प्रकल्प
– जवळपास 4.84 हेक्‍टर परिसरात प्रकल्प उभारण्यात येणार
– झीप लायनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, अँम्फी थिएटर, ओपन जीम व विविध खेळ
– प्राथमिक अंदाजानुसार जवळपास शंभर कोटी रुपयांहून अधिकचा खर्च अपेक्षित

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने बाणेर येथे सोमवारी बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद । Pune News

Next Post

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता ; आयोगाचा कालावधी एप्रिल २०२६ ते मार्च २०३१

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता ; आयोगाचा कालावधी एप्रिल २०२६ ते मार्च २०३१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

My Village Healthy Village campaign to start in maharashtra Healthy villages will get the title of Healthy Village

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

April 1, 2026
LPG-Gas

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली

April 1, 2026
Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

March 30, 2026
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

March 30, 2026
Kamshet-Police-Station

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.