Dainik Maval News : वडगाव मावळ शहरात मागील काही दिवसांपासून सायंकाळी व रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा अशा घटना घडल्या असून शहरात मुख्य बाजारपेठ मार्गावर सीसीटीव्ही असतानाही चोरटे खुलेआम दागिने हिसकविण्याचे प्रयत्न करीत असल्याने महिला भगिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापार्श्वभूमीवर शहरातील सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यासह महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, रात्रीच्या वेळी फेरफटका मारताना स्वतः ची काळजी घ्यावी. शक्यतो रात्रीच्या वेळी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
वडगाव शहरात बँक परिसर, शासकीय मुख्यालय, आठवडे बाजार, मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ रस्ता, मंदिर परिसर आदी ठिकाणी महिलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने येथे गस्त वाढवावी, आठवडे बाजार व रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी अधिक पथके तैनात करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई