Dainik Maval News : वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या चौथ्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील वैष्णवी योगेश दाभाडे तिने दहा ते बारा वयोगटात (४२ किलो वजन गट) सुवर्णपदक मिळवून नवीन इतिहास घडवला.
वैष्णवी दाभाडे हिच्या यशाबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तिचा विशेष सत्कार केला. त्यावेळी वडील योगेश दाभाडे, आई श्रद्धा दाभाडे, प्रशिक्षक सुभाष चंद्रकांत दाभाडे हे उपस्थित होते.
- वैष्णवी दाभाडे हिने केवळ मावळ तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव उज्वल केले आहे. यापुढे तिच्या यशाची कमान अशीच उंचावत राहावी व देशासाठी तिने नवीन नवीन विक्रम नोंदवावेत, या शब्दात आमदार शेळके यांनी वैष्णवीचे अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार सुनील आण्णा शेळके स्पोर्टस फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या दाभाडे मार्शल आर्टची सुवर्णकन्या वैष्णवी हे तळेगाव येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे.
दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत २७ देशातील ७२१ स्पर्धकांनी भाग घेतला. वैष्णवी हिने तीच लाईट प्रकारात ४२ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले.महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या हस्ते वैष्णवीला सुवर्णपदक व ट्रॉफी देण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ