आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे उपस्थित होते.
महाराष्ट्रात आदिवासी समाजाची संख्या अधिक आहे. प्रदेशानुसार अनेक आदिवासी जमाती राज्यात असलेल्या दिसतात. या सर्व आदिवासी जमातींच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असून त्या अनुषंगाने अनेक कसरतीचे खेळ प्रकार अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसतात. याच खेळांतील काही प्रकार लवकरच क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळणार आहेत. ( good decision tribal sports will be recognized as sports )
महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत. राज्यात एकूण जिल्ह्यातील आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक व ठाणे (सह्याद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल
– दैनिक मावळ विशेष । नारळी पौर्णिमा – “सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…..”
– वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी