Dainik Maval News : पुणे-लोणावळा उपनगरी रेल्वेसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर आता तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या उभारणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, तर मेट्रोच्या दोन स्थानकांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेशकुमार, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून, त्या परिसरातील औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला पाठबळ मिळणार आहे, तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.
तसेच पुणे मेट्रोच्या टप्पा एकमधील बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. आजच्या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार
