Dainik Maval News : मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी आहे. मुंबई-पुणे प्रवास आणखीन जलद व सोईस्कर व्हावा यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलेले आहे. याअंतर्गत कर्जत-लोणावळा दरम्यान नवा मार्ग विकसित केला जाणार आहे.
नुकताच हा दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेने तयार केला असून तो रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. ह्या प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- दरम्यान, मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व भागात कर्जत -लोणावळा आणि उत्तर पूर्व भागात कसारा- इगतपुरी या दोन प्रमुख घाट मार्गावर प्रत्येकी दोन नवीन ट्रॅक उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यापैकी कर्जत-लोणावळा भागातील मार्गासाठी दोन मार्गासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेच्या या प्रस्तावानुसार सदर प्रकल्पात भुयारी मार्ग व पुलांचा समावेश असेल. या प्रस्तावात काही एकेरी बोगदे असतील आणि त्यातून दोन्ही मार्गिका जातील, तर काही ठिकाणी दोन्ही मार्गिकांसाठी स्वतंत्र बोगदे असतील. सध्याचा मार्ग 26 किमीचा असला तरी नवीन मार्ग साधारण त्याहून दुप्पट लांबीचा असेल.
हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यान अतिरिक्त मार्गिका तयार होणार असून सेवांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे. तसेच नवीन मार्गाबरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार असल्याने त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates