Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.
अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब