भारतीय जनता पार्टी पक्षाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या माध्यमातून मावळ विधानसभा मतदारसंघात दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून विविध शहरांत आणि गावांत मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आतापर्यंत या अभियानातून जवळपास 5700 हून अधिक नवीन मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच लोणावळा शहर, कामशेत शहर, देहूरोड शहर, देहुगाव शहर आणि शिलाटणे गावात हे अभियान राबविण्यात आले आहे. दिनांक 13 ऑक्टोबरपासून तळेगाव शहरात हे अभियान सुरू करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
पुढील दिवसात हे अभियान मावळ विधानसभा मतदार संघातील सर्वच ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली. ( Good Response to Maval BJP Voter Registration Campaign )
अधिक वाचा –
– शेतकऱ्याचा खरा मैतर आणि जिवीचा जिवलग! मावळ तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा
– सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी भरत गोविंद ठाकर यांची बिनविरोध निवड
– स्थानिकांची हुशारी आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नांमुळे घोरपडीला जीवनदान । Vadgaon Maval