व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्याचा खरा मैतर आणि जिवीचा जिवलग! मावळ तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

मावळ तालुक्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Bailpola-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : मावळ तालुक्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बैलाची सजावट करुन ढोल ताशांच्या गजरात बैलाची मिरवणूक काढत बैलाचा मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा केला आहे. सद्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण आल्याने दिवसोदिवस बैलाची संख्या कमी होताना दिसत आहे.

परिसरातील ग्रामीण भागात अजुनही मोठ्या प्रमाणावर बैल पाळली जातात. परिसरात शेतीच्या कामासाठी दिवस रात्र शेतकऱ्या सोबत शेतात राबत असल्याने वर्षीतुन एकदा बैलाचा सण साजरा केला जातो. यावेळी बैलाची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी गावातील ग्रामदेवता च्या मंदिराच्या परिसरात वाजत गाजत बैलाची मिरवणूक काढली जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • बैलपोळा सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल सजावटी मध्ये चांगला दिसावा यासाठी शेतकरी आपल्या परिने त्याचा साजशृंगार बळीराजा खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते. नंतर गावातील इतर सर्व बैल गावातील ग्रामदेवता च्या प्रगणात पेरा मारला जातो. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते., असा हा पोळ्याचा सण आहे.

बैलपोळा भाद्रपद अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात भाताचे पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.परिसरात येळसे, काले,शिवली,करुंज, कडधे,वारु,महागांव, सावंतवाडी,कोथुर्णे यासह पवनमावळ विविध गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जातो.

अधिक वाचा –
– पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने येळसे गावात तयार झालेली अत्याधुनिक रोपवाटिका आदर्शवत – माजी मंत्री बाळा भेगडे
– मावळमधील मुलींसाठीचे एकमेव महाविद्यालय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन
– ‘भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करणे हे देशवासियांचे स्वप्न’ – पंतप्रधान मोदी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचे मुंबईत उद्घाटन


dainik maval jahirat

Previous Post

सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी भरत गोविंद ठाकर यांची बिनविरोध निवड

Next Post

अभिवादन नवदुर्गांना । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vanita-Sawant-Om-Pratishthan

अभिवादन नवदुर्गांना । ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.