‘नीट’ आणि ‘युजीसी नेट’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहे. NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाला असून भविष्यात पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी, त्या रोखण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा लागू केला आहे. केंद्र सरकारने ‘पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) कायदा, 2024’ अधिसूचित केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 21 जून 2024 (शुक्रवारपासून) केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या तरतुदी लागू केल्या आहेत. संसदेने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता. पेपरफुटीविरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. ( Government Of India Anti-paper leak law comes into force amid NEET UGC-NET row )
कायद्यात विविध 15 कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे –
1. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका फुटणे.
2. पेपर फोडण्यात सहभाग.
3. कोणत्याही अधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा ओएमआर शीट पाहणे किंवा ठेवणे.
4. परीक्षेदरम्यान कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने एक किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे दिल्यावर.
5. उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मदत करणे.
6. उत्तरपत्रिका किंवा OMR शीटमध्ये काही विसंगती आढळल्यास.
7. कोणत्याही अधिकाराशिवाय किंवा वास्तविक त्रुटीशिवाय मूल्यांकनातील कोणतीही फेरफार.
8. कोणत्याही परीक्षेसाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या मानकांचे आणि नियमांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा उल्लंघन झाल्यास.
9. उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता किंवा रँक निश्चित करण्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या कोणत्याही दस्तऐवजात छेडछाड करणे.
10. परीक्षा आयोजित करताना अनियमितता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षा मानकांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल.
11. संगणक नेटवर्क, संगणक संसाधन किंवा कोणत्याही संगणक प्रणालीशी छेडछाड देखील यामध्ये समाविष्ट आहे.
12. उमेदवाराने परीक्षेत फसवणूक करण्याच्या उद्देशाने आसनव्यवस्था, परीक्षेची तारीख किंवा शिफ्ट वाटप यामध्ये काही अनियमितता केली असल्यास.
13. सार्वजनिक परीक्षा प्राधिकरण, सेवा प्रदाता किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित लोकांना धमकावणे किंवा कोणत्याही परीक्षेत व्यत्यय आणणे.
14. पैसे उकळण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करणे.
15. बनावट परीक्षा आयोजित करणे, बनावट प्रवेशपत्र किंवा ऑफर लेटर देणे यासाठीही शिक्षा होऊ शकते.
The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024—the anti-paper leak law for examinations for central recruitment and entrance into central educational institutions—came into effect on Friday, June 21. pic.twitter.com/BapcieFZHa
— All India Radio News (@airnewsalerts) June 22, 2024
अधिक वाचा –
– देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड । Dehu Nagar Panchayat
– लोणावळा महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा ; योग अभ्यासकांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे
– जागतिक योग दिवस : तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास आणि योग प्रात्यक्षिके । International Yoga Day 2024