Dainik Maval News : अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ केली आहे. या निर्णयाला मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. ही भाववाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते ॲड दिलीप ढमाले यांच्यासह सतीश ढोरे, संजय आगळमे, कमलेश राक्षे, गोकुळ हिंगेसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पश्चिम आशियातील देशांमध्ये युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंंमती भडकल्या आहेत. त्या घडामोडीचा परिणाम म्हणून देशात गॅससह पेट्रोलियम उत्पादनाचा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढत्या गॅसची दरवाढ व तुटवडा दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘‘सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गॅस सिलिंडरची दरवाढ केली आहे. मात्र, या दरवाढीमुळे तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, पवनानगर, नाणे, पवन व आंदर मावळातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या उपजीवीकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,” असे निवेदनात नमूद आहे.
“मावळ तालुक्यातील गॅस एजन्सींवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य जनतेसह हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा व तोही शासनाच्या किंमतीत मिळावा, अशी मागणी सर्व व्यवसायिक करत आहेत. त्यामुळे सर्व हॉटेल चालकांना शासनाने न्याय द्यावा,” अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून गॅस दरवाढी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड