राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवार, दिनांक (22 ऑगस्ट 2023) मंत्रालयात देण्यात आले यावेळी ‘लवकरच अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी शाकीरा सय्यद, ललीता खांदे, कविता पाथरुट, शालन कटरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ( government will take positive decision on demands of anganwadi sevika workers said Aditi Tatkare )
अंगणवाडी सेविकांच्या महत्वाच्या मागण्या :
1) मानधन एकत्रित व नियमीतपणे मिळावे
2) कामगारांना पेंशन व ग्रजुईटी मिळावी
3) मोबाईल चांगल्या दर्जाच्या मिळावेत, रिर्चाजची रक्कम वाढवण्यात यावीत
4) परिवर्तन निधी वाढवून मिळावेत
5) पर्यवेक्षक भरतीमध्ये एम.एस.डब्ल्यू. ला प्राधान्य देण्यात यावे
6) अनुभव व शिक्षण यानुसार भरती करण्यात यावी
ह्या अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या असल्याची माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे. ( government will take positive decision on demands of anganwadi workers said Aditi Tatkare )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम
– सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’