व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम

डॉ. विनया केसकर यांनी डीएड कॉलेजमधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालून त्यांना बोलते केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 24, 2023
in लोकल, शहर
Inner-wheel-club-Talegaon

Photo Courtesy : Sandhya Thorat


नवनवीन आव्हानांना शिक्षकांनी कसे तोंड द्यावे, ह्या विषयाला अनुसरून हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम घडवून आणला. महाविद्यालयाचे प्राचार्य हिरामण लंघे यांनी सदरील परिसंवाद कार्यक्रमाला मान्यता दिली. त्यानंतर मंगळवारी, दिनांक 22 ऑगस्ट हा कार्यक्रम पार पडला. ( teacher training program was conducted at harakchand raichand bafna DEd College by Inner wheel club )

डॉ. विनया केसकर यांनी डीएड कॉलेजमधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालून त्यांना बोलते केले. अगदी केजी to पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात, त्यांच्यासमोर काय आव्हाने आहेत? या विद्यार्थ्यांना आपण कशी मदत करू शकतो? यावर उहापोह केला. मुलांमध्ये होणारे हार्मोनल बदल, त्यांच्या मेंदूची वाढ, वैचारिक क्षमता, भावनात्मक अनुभव आदी गोष्टी समजून घेऊन विद्यार्थी सक्षम कसा होईल, यावर भर दिला पाहिजे असे समजावून सांगितले.

शाळेच्या वर्गातील वातावरण कसे तणावमुक्त राहील, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद कसा साधायचा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, मुले मोहाला बळी पडू नयेत म्हणून यासाठी कशी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता त्यांचा आत्मसन्मान जपावा असा मोलाचा सल्लाही दिला. क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात ह्या देखील याच कॉलेजच्या माजी विद्यार्थीनी असून इथे डिग्री घेऊन त्यांनी मार्गक्रमण केल्याचे उपस्थितांना सांगितले.

विद्यार्थिनींच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी ह्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन इनरव्हील क्लब तर्फे करण्यात आले होते. प्राध्यापिका शुभांगी हेंद्रे यांनी अत्यंत मार्गदर्शक परिसंवादाबद्दल डॉ विनया केसकर आणि क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे आभार मानले. यावेळी बाफना कॉलेजच्या शीतल गवई, शुभांगी हेंद्रे या शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी संध्या थोरात, निशा पवार, प्रकल्प प्रमुख डॉ विनया केसकर तसेच माजी प्रवीण साठे, सभासद कोमल सूर्यवंशी यांचा सत्कार केला. ( teacher training program was conducted at harakchand raichand bafna DEd College by Inner wheel club )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3


Previous Post

मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यामार्फत श्री बेलेश्वर देवस्थान इथे वृक्षारोपण

Next Post

महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Solar-street-lights

महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.