व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप

जरा-जिवंतीका पूजनाचे विधान - या पूजनाची माहिती स्कंदपुराणात आहे. या देवते विषयी अनेक लोक कथा प्रसिध्द आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, देश-विदेश, मावळकट्टा, लोकल, शहर
Nag-Narasoba-Photo

File Image


Dainik Maval News : जरा-जिवंतीका पूजनाचे विधान – या पूजनाची माहिती स्कंदपुराणात आहे. या देवते विषयी अनेक लोक कथा प्रसिध्द आहे. एक कथा तर आगदी महाभारातातील जरासंधाच्या जन्माशी निगडीत आहे. जरा नावाच्या राक्षसीणीची कथा जोडली आहे. जरा म्हणजे राक्षसीण नव्हे तर मग कोण आहे. काही शास्त्रकार जरा म्हणजे म्हातरपण् असा अर्थ सांगतात. संस्कृत शब्दांचे स्थानिक भाषेत वेगळेच अर्थ सांगितले जातात. शास्त्रीय ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे भाषांतर करताना संस्कृत भावार्थ लक्षात घेवुन त्याचा अर्थ स्वीकारला पाहिजे.

जन्ममृत्यु जराव्याधि दुःख दोषानु दर्शनम् ॥९॥ गीता
जरा व्याधी म्हणजे रोग व्याधी निवारण करण्यासाठी आयुर्वेद शास्त्रग्रंथात रोगांची विविध नावे आहे. भारतीय संस्कृतीत मातृकापूजन हे पुर्वावार चालत आलेले आहे. जन्म आणि मृत्यु याचे नियंत्रण कोणत्यातरी शक्तीच्या हाती आहेत आणि या शक्तीची उपासना केली तर मृत्युपासुन दूर राहू शकतो. आई शिवाय आपल्या मुलांचे हित कोणी पाहू शकत नाही. त्यामुळे या शक्तीला मातृदेवता म्हणून पुजन केले जात असे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये अनेक मातृदेवतांच्या मातीच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. ( Shravan Month Nag Panchami Festival Nag Narasoba Photo Jara Jivantika Pujan Read Information in Marathi )

पुढे हि कल्पना विस्तारुन सप्तमातृका ज्या सात प्रमुख देवतांच्या शक्ती आहेत, त्यांचे पुजन सुरु झाले. देवता पुरुष स्वरुपात आणि त्याची शक्ती ही स्त्रीरुपात दर्शवली जाते. यक्ष यक्षीणी ही कल्पना पुढच्या काळात जास्त मोठया प्रमाणात विकसीत झाली. आगदी बौध्द आणि जैन धर्मीयांनी सुध्दा ती स्वीकारली. बौध्द साहित्यात हारीती नावाची यक्षीनी मुलांना खात असे. पुढे ती मुलांचे रक्षणकर्ती झाली असे दाखले आहेत. तर बदामीच्या चालुक्य राजांनी एक लेख कोरून घेतला आहे. या लेखात ते हारीतीचे वंशज असून, त्यांचे संगोपन-संवर्धन सप्त मातृकांनी केल्याचा उल्लेख आहे. तो असा : ‘हारीती-पुत्रनाम्‌सप्तमातृभिरभिवर्धितानाम्’ प्रमाणे केला आहे. ही हारीती कुबेराची पत्नी आहे.

अनेक यक्षीकां पैकी अंबिका यक्षी ही मुलांचे रक्षणकर्ती यक्षी म्हणून पुजण्यात येते. अजिंठा वेरुळ मध्ये या देवतांचं अंकन केले आहे. पूर्वी लहानमुलांमध्ये साथीचे रोगामुळे मृत्युच प्रमाण मोठे होते. औषधांची माहिती सगळ्यांना उपलब्ध नव्हती. त्यामुळे अश्या कोणत्यातरी देवतेची उपासना केली की मुलांचे जीव वाचवले जातील, या कल्पनेतुन जीवदान देणारी देवता “जिवंतीका” जी मुळची मातृदेवता होती तीची पुजा करण्याची प्रथा सुरु आहे.

नरसिंह ही देवता भक्त प्रल्हादाशी निगडीत आहेत. प्रल्हाद त्याच्याच कृपेने नाना आघातांपासून वाचला तसा आपली ही मुले वाचावीतच, हा भाव या मागे आहे. कालियादर्मन करणाराकृष्ण – कृष्णजन्म याच महिन्यात असतो. त्याच बरोबर तो गोपाळ आहे. त्यांने सोबत राहून अनेक गोपालाचे रक्षण केले आहे. तो कृष्ण आपल्या मुलांचा सोबत राहून त्यांचे रक्षण करो, यासाठी कृष्ण पुजन आहे.

हेही वाचा – उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख

नागवंशीय समाज हा पुर्णत: वेगळा होता त्यांच्या कडे नागपूजा चालत होती. महाविलयन प्रक्रियेत त्यांचा समावेश केल्या पासून नागपूजन केले जावु लागले. नागपंचमी हा सण ही श्रावणात येतो. त्याचे स्वतंत्र व्रत आहे. बुध आणि गुरु पुजन – ज्योतिष शास्रागुप्रमाणे बुध हा बुद्धीचा कारक आणि गुरु हा ब्रहसपती म्हणजे देवांचा गुरु आहे. नाना शास्त्र, विद्या या गुरुच्या उपासना मुळे प्राप्त होतात. त्यांची वाहने म्हणजे प्रतिके ही हत्ती व वाघ ही सामर्थ्याची लक्षणे आहेत. आपली मुले ही याच्या प्रमाणे होण्यासाठी त्याचा आदर्श या पुजनाच्या निमित्ताने घातला आहे.

आघाडा व दुर्वा – धर्म आणि विज्ञान एकत्रित करण्याची भारतीय परंपरा येथे पहावयास मिळते दोन्ही वनस्पती या औषधी आहेत. आघाडा – या वनस्पती आयुर्वेदात अपामार्ग असे म्हणतात. ही वनस्पती फक्त पावसाळ्यात पहावयास मिळते. ही बहुगुणी वनस्पती असून अनेक रोगांवर याचा उपयोग होतो. मस्तीकरोग – ज्यात स्मरणशक्ती कमकुवत होणे सारखा रोग, दात, डोळ्यांचे रोग, मुत्रविकार, पोटदुखी सारख्या रोगांवर याचा रामबाण उपाय असतो. आजीबाईच्या बटव्यामधील महत्वाची वनस्पती सगळयांना ओळखता यावी, यासाठी या पुजनात त्याचा उपयोग केला आहे. लहान मुलांच्या रोगामध्ये याचा काढा दिला जात असे.

एकंदरीत जन्मजात शिशु ते कुमारवयातील मुलासाठी आईने मायेने करावयाचे व्रत हे जीवंतिकेचे व्रत आहे. शेवटी भारतीय परंपरेत मातृशक्तीचे महत्व सर्वात जास्त आहे. आगदी आपण आपल्या देशाला भारतामाता म्हणतो. शास्त्र आणि श्रध्दा याचा संगम असलेले आपले सण आणि व्रते मुळ उद्देश समजून साजरे केले पाहिजेत. ( Shravan Month Nag Panchami Festival Nag Narasoba Photo Jara Jivantika Pujan Read Information in Marathi )

लेखक – अजित दि देशपांडे (संतविचार अध्यासन)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime  


Previous Post

आमदार शरद सोनावणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा मावळमधील रामोशी समाजाकडून तीव्र निषेध ; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Next Post

डास उत्पत्ती होऊन साथीचे आजार बळावू नयेत याकरिता टाकवे बुद्रुक येथे आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
To prevent mosquito breeding epidemic diseases Health Department conduct container survey at Takwe Budruk

डास उत्पत्ती होऊन साथीचे आजार बळावू नयेत याकरिता टाकवे बुद्रुक येथे आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.