राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. ( Gram Panchayat Election 2023 Candidates are invited to submit their campaign expenses )
अधिक वाचा –
– दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन
– ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या
– स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा