Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, एकूण ८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेतून टाकवे खुर्द ग्रामपंचायत – २० लाख रू. तर कुसगाव बु. ग्रामपंचायत २५ लाख रू., सांगिसे ग्रामपंचायत २० लाख रू., घोणशेत ग्रामपंचायत २० लाख रू. एकूण ८५ लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. या मंजुरीमुळे ग्रामपंचायतींना आधुनिक, सुटसुटीत व नागरिकाभिमुख कार्यालयांची उभारणी करता येणार असून, ग्रामस्थांना अधिक सक्षम व दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत कार्यकाळ प्रभावी होईल आणि प्रशासनिक कामकाज सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या निधीसाठी आमदार सुनील शेळके यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पुढाकाराला यश मिळाले असून, तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार शेळके म्हणाले, “ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे केंद्र आहे. सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या की ग्रामविकासाला गती मिळते. या निधीमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना वेळेवर सेवा मिळेल.” या निर्णयाचे ग्रामस्थ व स्थानिक जनप्रतिनिधींनी स्वागत केले असून, “आमदार सुनील शेळके हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मावळ तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News

