भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे. रविवारी (दि. 3) उर्से येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थतीत मावळ तालुक्यातील या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मावळ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांचा सत्कारही करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची आणि शेती क्षेत्रासाठी केलेल्या विकास कामांची माहिती ग्राम परिक्रमा अभियानच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे कार्य देखील यानिमित्ताने केले जाणार असल्याची माहिती यावेळी बोलतांना रविंद्र भेगडे यांनी दिली. ( Gram Parikrama Yatra Abhiyan Started From Urse Village In Maval Taluka Through BJP Kisan Morcha )
याप्रसंगी जेष्ठ नेते बाबूलाल गराडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, मावळ तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, कार्याध्यक्ष विकास शेलार, भाजप उर्से गाव अध्यक्ष रोहिदास धामणकर, नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, शिवसेनेचे नेते भारतशेठ ठाकूर इत्यादी मान्यवर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
भाजपा मावळ तालुका युवा मोर्चा संमेलन उत्साहात संपन्न –
भारतीय जनता पार्टी मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे यांनी युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करून या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व युवा संमेलन भेगडे लॉन्स वडगाव मावळ येथे आयोजित केले होते. या युवा संमेलनास राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील, प्रभारी भास्कर म्हाळसकर, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व सन्माननीय जेष्ठ प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ
– पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad