वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी उपलब्ध केल्याबद्दल मोरया प्रतिष्ठान (morya pratishthan) वडगाव मावळ यांच्या वतीने मावळचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांचा शनिवारी (दि. 24) भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी मनापासून आभार व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
‘वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे. तालुक्याचे प्रशासकीय शहर असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यानंतर शहराचा नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. यादृष्टीने शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, डांबरीकरण करणे, सौर दिवे बसविणे, नगरपंचायत इमारत बांधणे, अग्निशमन वाहन उपलब्ध करणे, विद्युत शवदाहिनी बसविणे इ. कामे पूर्ण झाली आहेत. स्वतंत्र पाणी योजनेचेही लवकरच काम होईल. तसेच पुढील काळात देखील नागरिकांच्या हिताच्या कामांना निधी कमी पडु देणार नाही, हा विश्वास सर्वांना देतो.’ हा विश्वास आमदार सुनिल शेळकेंनी नागरिकांना दिला. (Grand civil felicitation of MLA Sunil Shelke in Vadgaon Maval through morya pratishthan)
अधिक वाचा –
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ
– मोशी येथे देशातील सर्वात मोठ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
– स्तुत्य उपक्रम! रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन शाळांमध्ये बांधले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिपूजन संपन्न । Talegaon Dabhade