Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिक्षण चळवळीत एक नवीन पान जोडलं जात आहे. वडगाव मावळ येथे सोमवार, दिनांक 12 जानेवारी रोजी ईडन इंटरनॅशनल स्कूल या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज विद्यालयाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव, तळेगाव तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं सुसज्ज असं विद्यालय ‘ईडन इंटरनॅशनल स्कूल, वडगाव मावळ’च्या माध्यमातून मिळणार आहे. या विद्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भास्करराव म्हाळसकर, ईडन स्कूलचे चेअरमन जस्टीस देवदास, ईडन स्कूलचे सदस्य विशाल म्हाळसकर, अतुल म्हाळसकर आणि युवा उद्योजक संदीप म्हाळसकर यांनी केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे, भाजपाच्या युवा नेत्या मृणाल म्हाळसकर, नगरसेवक सुनील ढोरे, दिनेश ढोरे, अजय म्हाळसकर, अनंता कुडे, माया चव्हाण, विशाल वहिले,सुदाम शेळके, निखिल भगत, पंढरीनाथ ढोरे, विनोद भेगडे, सारिका चव्हाण, सुनिता सुतार, रोहित धडवले, सत्यम खांडगे, चिराग खांडगे, गणेश म्हाळसकर, अजय भवार, स्नेहा खांडगे, सुनिता ढोरे, पुनम भोसले, ऋतुजा भगत, आशा भेगडे, रूपाली ढोरे, आकांक्षा वाघवले, वैशाली सोनवणे आदी उपस्थित राहणार आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका अर्चना म्हाळसकर, राणी म्हाळसकर, भरत म्हाळसकर, निलेश म्हाळसकर, विशाल म्हाळसकर, अतुल म्हाळसकर आणि युवा उद्योजक संदीप माळसकर यांनी ही माहिती दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
