Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या दिवाळीमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा भेगडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बापूसाहेब भेगडे यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक जड होत चालले आहे.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी तळेगावमधील राव कॉलनी, हरणेश्वर कॉलनी, गंगा रेसिडेन्सी, पैसा फंड कॉलनी, मावळ लँड सोसायटी, स्वराज नगरी, इंद्रायणी कॉलनी, जोशीवाडी, तसेच आदी परिसरात सदिच्छा भेटी देत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत बापूसाहेब भेगडे यांना विजयाचा विश्वास दिला. परिसरातील विविध मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेत भेगडे यांनी आशीर्वाद देखील घेतले.
मतदारसंघातील तळेगाव परिसरात गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. संपूर्ण तळेगावात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्तेही दिवसरात्र भेगडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून बापूसाहेब भेगडे यांनाच मतदान करावे, असे आवाहन करीत आहेत.
बापूसाहेब भेगडे यांनी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश काकडे यांच्या समवेत तळेगावमधील अशोक विक्रम सोसायटी, कैकाडी आळी, भोई आळी, खंडोबा माळ आदी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल, असे आश्वासन दिले. रविवार आठवडे बाजारातील विक्रेत्यांचीशी बापूसाहेब भेगडे यांनी संवाद साधला आणि येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत सातत्याने पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा मतदारसंघ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval