Dainik Maval News : संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. संस्थेचे उपाध्यक्ष पोपट कालेकर व माता पालकांच्या हस्ते गौतम बुद्ध, माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
- पूजास्थान पाट, रांगोळी आणि गुलाब पाकळ्यांनी सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपआपल्या मातांचे पदपूजन करून पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला. यावेळी शाळेतील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले होते. आई आणि गुरू यावर आधारित गीतांमुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गुरू आणि माता यांच्यावर आधारित अनेक भित्तीपत्रके विद्यार्थी आणि शिक्षकां मार्फत तयार करण्यात आली होती.
यावेळी गुरू पोर्णिमेची पार्श्वभूमी, गुरू शिष्य परंपरा क्रीडा विभाग प्रमुख कैलास येवले यांनी, तर गुरूमहिमा पर्यवेक्षक बाळू कदम यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माता सर्व वातावरण पाहून भारावून गेल्या होत्या. मनोगत व्यक्त करताना त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत.
कार्यक्रमासाठी माता पालक प्रतिनिधी आरती घारे, मधु दळवी, प्रतीक्षा करवंदे, पूनम दाभाडे, आरती कालेकर, सुहासिनी पाटील, दिपाली ढोरे, दिपाली यादव, सुजाता सोनवणे, पूनम कालेकर, श्रध्दा बोहरा, वृषाली लायगुडे, ज्योती शिर्के आदी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत धनवे आणि विघ्नेश सावळे यांनी केले तर आभार उत्कर्ष ताकदुदे याने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, कल्याणी सावंत, शीतल शिर्के, राजश्री लोहार, केतकी गायकवाड, वैष्णवी सोनवणे, काजल पडवळ, प्राची आढाव आदींनी विशेष मेहनत घेतली.
आजच्या धावपळीच्या युगात आणि मोबाईल च्या नादात संस्कारांची कमतरता पाहायला मिळत आहे. पण शाळेच्या माध्यामातून असे उपक्रम राबवून निश्चितच संस्कृती आणि संस्कार जपले जात आहेत. – आरती संतोष घारे, प्रतिनिधी, माता पालक संघ
शाळेने राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. समाजात वेगवेगळे गुरू भेटत असताना आपले आई वडील आणि आपले आचार्य यांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांकडून हे संस्कारी कृत्य होत असताना खूप आनंद झाला. – सविता कालेकर, प्रतिनिधी, माता पालक संघ
संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त मातृपूजन घेण्यात आले खूप आनंद वाटला. आमच्या मुलांवर चांगले संस्कार या मार्फत होत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. – पूनम दाभाडे, प्रतिनिधी, माता पालक संघ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित