व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात तब्बल 2 लाख 94 हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; मुद्देमालासह 2 आरोपी अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिनांक २५ मार्च रोजी केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहरात अवैध गुटख्यावर कारवाई करुन तब्बल ७,५४,५५४ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह २ आरोपींना अटक करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 26, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिनांक २५ मार्च रोजी केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहरात अवैध गुटख्यावर कारवाई करुन तब्बल ७,५४,५५४ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह २ आरोपींना अटक करण्यात आली. ( Gutkha And Tobacco Products Seized In Talegaon Dabhade City Two Accused Arrested With Material )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने दिनांक २४ मार्च २०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे अधिपत्याखाली सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढण्याकरीता तळेगाव दाभाडे भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राखाडी रंगाची इको गाडी (गाडी क्रमांक MH- 14/EY/3668 ) ही गाडी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे इथे रात्री उशीरा येणार आहे. या गाडीत प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा विक्री करीता आणणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. ( Pimpri Chinchwad Commissionerate Crime Branch Anti Extortion Squad )

त्यामुळे सपोनि उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला ब्रीफ करुन कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब जवळ सापळा लावुन दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्री दीडच्या सुमारास इको कार ( क्रमांक MH – 14/EY / 3668 ) मधून निहार गोपाल विश्वास (वय ५१ वर्षे रा. म्हस्करनेस कॉलनी, तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे) असे सांगुन त्याचे सोबत असलेला इसम हा त्याचा कामगार असून त्याचे नाव अविजीत रणजीत बाच्छार (वय २६ वर्षे) यांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच इको कारची पाहणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक/ अपायकारक असा २,९४,५५४रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आला. तसेच इको कार, २ मोबाईल व २,९४,५५४ रुपयेचा गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ७,५४,५५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यांच्याविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३,१८८, ३४ सह अन्न आणि सुरक्षा मानके कायदा कलम ३० (२) (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Gutkha And Tobacco Products Seized In Talegaon Dabhade City Two Accused Arrested With Material )

हेही वाचा – किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण

सदरची कारवाई विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) मनोज लोहीया (सह पोलीस आयुक्त) डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त) स्वप्ना गोरे (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –

– अपघात ब्रेकिंग! द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाट्याजवळ साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक उलटला
– ओवळे गावातील श्री म्हसोबा देवस्थान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची दुचाकी चालक तरुणाला जमाव करुन बेदम मारहाण

Next Post

तळेगाव दाभाडे शहरात वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिर, 62 नागरिकांनी घेतला लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sugar-Testing-Camp

तळेगाव दाभाडे शहरात वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत शुगर टेस्टिंग शिबिर, 62 नागरिकांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.