मावळ तालुक्यातील सुवर्ण कन्या हर्षदा गरूड हिने पुन्हा एकदा मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मनामा बहरीन येथे सुरू असलेल्या एशियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मावळच्या हर्षदा गरुड हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. तसेच ही कामगिरी करणारी ती महाराष्ट्रातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. हर्षदाने 45 किलो गटात तिने एकूण 152 किलो वजन उचलले. यात स्नॅच प्रकारात 68 तर क्लीन अँड जर्क प्रकारात 84 किलो वजन उचलले. ( Harshada Garud Won Bronze Medal At Asian International Championships In Manama Bahrain )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हर्षदा गरुड ही वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलची खेळाडू आहे. वडगाव मावळला वेटलिफ्टींगची पंढरी असे देखील संबोधले जाते. हर्षदा ही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टींगचे धडे घेत आहे. यापूर्वी तिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात ‘खेलो इंडिया युथ गेम्स- 2020 चे विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलेले. यावर्षीच मे महिन्यात ग्रीसमधील हर्क्युलेन येथे जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती.
हर्षदाचा प्रेरणादायी प्रवास
– बिहिरीलाल दुबे यांच्या वडगाव मावळ येथील ‘दुबेज गुरुकुल’ येथे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यालयात कला शाखेतून शिक्षण
– आसाममधील ‘खेलो इंडिया युवा’ स्पर्धेत सुवर्णपदक
– पतियाळा येथील राष्ट्रीय सब- ज्युनियर स्पर्धेत रौप्यपदक
– पतियाळा आणि ओडीसा येथील राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत ब्राँझ
– मिशन ऑलिम्पिक २०२४/२८ एक्सलन्स करीता निवड
– ग्रीसमधील हेराकिलॉन येथील स्पर्धेत 45 किलो गटात सुवर्णपदक जिंकले (ऐतिहासिक)
( Harshada Garud Won Bronze Medal At Asian International Championships In Manama Bahrain )
अधिक वाचा –
शेतकरी संजय भेगडे यांचा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून सत्कार, केलीये ‘ही’ खास कामगिरी
मोठी बातमी..! केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिंदे-ठाकरे दोघांना धक्का, वाचा सविस्तर