व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवणार; मावळ तालुका काँग्रेसकडून नवी आरोग्य मोहीम । Maval News

मावळ तालुक्यातील गावखेड्यातील रुग्णांना ह्या योजनेचा प्रभावीपणे लाभ घेता यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 1, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Mahatma-Phule-Jan-Arogya-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


महात्मा फुले जन आरोग्य योजना मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात रुजवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगाव मावळ येथील बैठकीत देण्यात आली. महाराष्ट्रात दारिद्र्य रेषे खालील म्हणजेच पिवळे रेशन कार्ड धारक तसेच दारिद्र्य रेषे वरील म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक हे सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत. मावळ तालुक्यात पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, मायमर जनरल हॉस्पिटल, ढाकणे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल लोणावळा ह्या सक्रिय हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे उपचार केले जातात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यामुळेच मावळ तालुक्यातील गावखेड्यातील रुग्णांना ह्या योजनेचा प्रभावीपणे लाभ घेता यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य सेवक याची माहिती माहिती देणार आहेत. सुमारे दीड लाख रुपये कॅशलेस स्वरूपातील रुग्ण वरील हॉस्पिटलमध्ये वापरू शकतात. त्यासाठी योजनेनुसार विविध पात्र आजारांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे. एन्जिओप्लास्टी व किडनी संबंधित विविध आजार देखील या योजनेत मोफत देण्यात येतात. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेचा सर्व स्तरीय पात्र रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ तालुका काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांनी केले आहे. ( Health Campaign By Maval Taluka Congress Mahatma Phule Jan Arogya Yojana Will Be Conveyed To Every Village )

प्रत्येक गावखेड्यात जाऊन आरोग्य सेवक, ग्रामसेवकांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देऊन पात्र रुग्णांसाठी वरील पाच पैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचारांसाठी तत्पर असणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली. आरोग्य मित्रांच्या मदतीने वरील हॉस्पिटल मध्ये प्रभावी सेवा मिळावी यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लवकरात लवकर महात्मा फुले योजनेचे कार्ड वितरित करण्याचा कार्यक्रम काँग्रेस कमिटी तर्फे राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी दिली.

अधिक वाचा –
– ब्रेकिंग! थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News
– दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade
– कौतुकास्पद! मावळच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड । Chaitanya Kondbhar


Previous Post

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट

Next Post

वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Fata-Chowk

वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.