व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2023
in लोकल, शहर
Mavalbhushan-Krishnarao-Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सदस्या निरूपा कानिटकर, संजय साने, युवराज काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, शिक्षक उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

व्याख्यानमालेची सुरुवात मंगळवारी (दि. 2 जानेवारी) जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या ‘स्वप्न बघा’ व्याख्यानाने होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे हे असणार आहेत. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प बुधवारी (दि. 3) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गुंफणार असून ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे असणार आहेत. तिसरे व्याख्यान गुरुवारी (दि. 4) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते होणार असून ते भारतीय संस्कृती आणि विश्वत्मकता या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर असतील. ( Mavalbhushan Krishnarao Bhegade lecture series organized by Indrayani Vidya Mandir Sanstha Talegaon )

व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर हे गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई असणार आहेत. पैलवान चंद्रकांत सातकर, भास्करराव म्हाळसकर, डॉ. अनंत परांजपे आणि शैलेश शाह आदी मान्यवरांचा इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला असून संयोजकांनी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

तसेच यावेळी संस्थेच्या इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयाचे नामकरण कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) असे करण्यात येणार आहे. हे नामकरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– ‘बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर’ : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report
– पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा
– मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद! मावळच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड । Chaitanya Kondbhar

Next Post

थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
man-drowning-Indrayani-river

थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.