व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आज शनिवारी (दि. 30 डिसेंबर) मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात प्रवेश केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Sanjog-Waghere-Joins-Shivsena

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ज्या घडामोडची अटकळ दैनिक मावळकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आज शनिवारी (दि. 30 डिसेंबर) मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः संजोग वाघेरे यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटात गेल्याने शिवसेनेची पारंपारिक जागा असलेल्या या ठिकाणी ठाकरे गटाकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे आगामी लोकसभेसाठी श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा स्वतःची उमेदवारी घोषित केली असताना दुसरीकडे आता ठाकरे गटाकडूनही संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत. ( NCP Leader Sanjog Waghere Joins Shivsena UBT May Be Contest Upcoming Maval Lok Sabha Election 2024 )

उद्धव साहेब देणार ती जबाबदारी पार पाडणार – संजोग वाघेरे

“मागच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत महत्वाचे काम केले. त्यावेळेचे काम पाहून मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावूक झालो होतो. तसेच संजय राऊत हे दरदिवशी मीडियाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम करतात. ठाकरे गटाने मागच्या काळात अनेक महत्वाची काम केली आहेत. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचे, असे ठरले आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच उद्धव साहेब जी जबाबदारी माझ्यावर देतील, ती पार पाडेन” असे संजोग वाघेरे यांनी बोलताना सांगितले.

मावळची जागा पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायचीये – संजय राऊत

“पन्नास खोके आणि स्कॉर्पिओ बॉलेरो यांना लाथाडून संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून परिवारात सामावून घेतले आहे. आम्ही प्रत्येक वेळी शिवसेनेत भावूक होतो. यातच आता संजोग वाघेरे यांना मावळ जागा पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायची जबाबदारी आहे. नववर्ष मावळतांना पुन्हा मावळ आपल्याकडे उजेडात आणायचं आहे.” असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

मावळ मतदारसंघ पहिल्यापासूनच शिवसेनेकडे राहिलाय – उद्धव ठाकरे

“मातोश्रीत आलेल्या सर्व शिवसेनेच्या वाघांनो तुमचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो. असा काळ आहे की आता भावूक आणि घाऊक असा फरक कळायला लागला आहे. जे भावूक आहेत ते निष्ठेने शिवसेनेसोबत आहेत. परंतू जे घाऊक आहेत त्यांना खोक्यांमध्ये बांधून ठेवण्याची गरज आहे. सुरूवातीपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. गद्दार आणि स्वाभिमानी यातला फरक संजोग वाघेरे यांच्यामध्ये आहे. आज शिवसेनेकडे काहीच नाही. परंतू सत्ताधाऱ्यांनी सत्ता हिसकावून घेतली आणि गद्दारी केली. परंतू सत्ताधारी पक्षाकडे गर्दीचा ओघ असतो. परंतू सत्ता नसतांना सत्ता आणण्याच्या जिद्दीने आपण आला आहात,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेशावेळी बोलताना दिली.

अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics
– महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana
– लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime


dainik maval jahirat

Previous Post

खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News

Next Post

पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Lake-Camping

पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.