व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2023
in लोकल, ग्रामीण
Pavana-Lake-Camping

Photo Courtesy : Team Dainik Maval


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच आज रविवार 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतूकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पवना धऱण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून पवनानगर इथे वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शनिवारपासून ते 1 जानेवारीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवनानगर धरण परिसरात बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे पवनानगर चौक आणि परिसरात वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, 30 डिसेंबर शनिवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते 1 जानेवारीपर्यंत पवनानगर (ता.मावळ) येथील रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. ( Traffic changes in Pavana Dam Pavananagar area Maval Taluka )

पवनानगर येथील वाहतूक व्यवस्थेतील नियोजित बदल खालीलप्रमाणे ;

  1. पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार-चाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे-मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे वारु फाटा, ब्राम्हणोली फाटा मार्ग अशी एकेरी वाहतूक करुन जवन फांगणे, ठाकूरसाई, खडक गेव्हेंडे, जवण-चावसर-मोरवे-तुंग अशी जातील.

2. पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी जड-अवजड वाहने पवनानगर मार्गे, जुने रेस्ट हाऊस, केदारी खानावळ चौकातून सात नंबर कॉलनी, पत्राचाळ, ग्रामपंचायत सचिवालय अशी बाह्यवळण मार्गे जातील.

3. दुधीवरे बाजूकडून पवनानगरकडे येणारी जड-अवजड वाहने ही दुधीवरे, पवनानगर बाजार, अशी जातील.

4. तुंग, मोरवे, चावसर, जवन, खडक, गेव्हडे, ठाकूरसाई, फांगणे बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करुन ती एकेरी वाहतूक करुन ब्राम्हणोली फाटा उजवीकडे, वारु फाटा सरळ, मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरून डावीकडे कोथुर्णे गावातून उजवीकडे, शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा, उजवीकडे कामशेत, मुंबई-पुणे अशी जातील.

अधिक वाचा –
– एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics
– महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?

Next Post

‘बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर’ : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PCMC-BRT

'बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर' : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.