व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News

तलावात अडकून पडलेल्या सापांना वर काढण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेण्याचे ठरले. त्यानुसार खालापूर - खोपोली स्नेक रेस्क्यूअर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना त्या ठिकाणी पाचारण केले गेले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 30, 2023
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Khopoli-Snake-Rescuers

Photo Courtesy : Team Dainik Maval


खालापूर तालुक्यातील (जि. रायगड) तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेत तलावाशेजारच्या डोंगराला दिनांक 26 डिसेंबर रोजी लागलेला वणवा विझवताना वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना शेततळ्यात रात्रीच्या अंधारात हालचाल होताना दिसली. त्यांनी विजेरीच्या प्रकाशात अंदाज घेतला असता काही साप तलावाच्या पाण्यात पडलेले पाहिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी दिलीप बांगरा या स्थानिक युवकाने तलावात एकूण सात साप असल्याचे त्यांना कळविले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तलावात अडकून पडलेल्या सापांना वर काढण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेण्याचे ठरले. त्यानुसार खालापूर – खोपोली स्नेक रेस्क्यूअर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना त्या ठिकाणी पाचारण केले गेले. तलावात अडकून पडलेल्या सापांपैकी सहा साप हे घोणस जातीचे विषारी, तर एक नानेटी जातीचा बिनविषारी साप होता. ते साप खूप वेळ पाण्यात असल्याने त्यांची हालचाल मंदावलेली दिसत होती. सापांना तलावात असलेल्या गुळगुळीत प्लॅस्टिकच्या आवरणामुळे वर येण्यास जमत नव्हते, ते बिथरलेल्या अवस्थेत असल्याने ॲटॅकिंग पोझिशन मध्ये होते. त्यांना सहजासहजी बाहेर काढणे जिकरीचे होते. त्या कारणे सेफ्टी बेल्ट व अन्य सुरक्षेची साधने वापरून जवळ जवळ दोन तासांच्या प्रयत्नानंतर सर्व सापांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे शक्य झाले. त्या सर्व सापांना सुरक्षित वन क्षेत्रात रिलीज केले आहे.

दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, सुशील गुप्ता, अशोक मेस्त्री, शुभम कंगळे, महेश भोसले, धर्मा पाटील आणि गुरुनाथ साठेलकर यांनी योजनाबद्ध रीतीने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. एवढ्या जास्त संख्येने एकाच ठिकाणी घोणस जातीचे विषारी साप आढळून येण्याची आणि त्यांना सुखरूप रेस्क्यू करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जेष्ठ सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी सांगितले. ( Khopoli Snake Rescuers rescue 6 snakes in Raigad Khalapur taluka )

शेतीसाठी या तलावाचा वापर होत असतो त्याचप्रमाणे गावकऱ्यांची देखील त्या ठिकाणी ये-जा असते. याकरणे सर्प दंशाची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. खालापूर तालुक्याचे वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना दृष्टीपथास आली. या दुर्गम ठिकाणी येऊन आपला जीव धोक्यात घालून दोन्ही रेस्क्यू टीमनी संयुक्तपणे मोहीम राबवून त्या सापांना जीवदान दिल्याबद्दल या शेततळ्याचे निर्माते गोदरेज कंपनीचे अधिकारी तानाजी चव्हाण आणि तांबाटी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

अधिक वाचा –
– लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics

Next Post

खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavala-city-police-crime-news

खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.