Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या येलघोल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. तसेच आवश्यकतेनुसार पालकांच्या परवानगीने औषधेही देण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन घारे यांच्या प्रयत्नातून आणि मनशक्ती फाउंडेशन माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास अर्जुन घारे हे अध्यक्षस्थानी होते. मनशक्ती फाऊंडेशनचे डॉ. सुहास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही छोटे प्रायोगिक खेळही विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश तांदळे यांनी केले. शिक्षक संतोष भेगडे यांनी उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच प्रियंका घारे, सुखदेव घारे, जयवंत घारे, प्रदीप घारे, नरेश भरणे, डॉ. ओम भाऊसार, चेतन वेदक, अल्पना पाफाळे, नंदकिशोर खंडेलवाल, उमेश भुतडा, वैशाली घारे, सीमा शेडगे, वैशाली घारे, पूर्णिमा कदम, कुंदा ठाकर, ताईबाई घारे उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar
