व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

तळेगाव दाभाडे शहर ते चाकण-रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Ajit-Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रिंग रोड केल्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटू शकत नाही. रिंग रोडची निविदा काढली आहे. रिंग रोडला समांतर लोहमार्ग करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मंगळवारी (दि. 17 जून) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. हा मार्ग झाल्यास झाल्यास पुणे स्थानकावरील ताण काम होईल, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शाम लांडे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पुढील ५० वर्षांचे नियोजन करून शहराचा विकास केला. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामात काहींनी स्वत:ची पोळी भाजून घेतली. शहरातील वाढत्या लोकसंख्येला वाढीव पाण्याची आवश्यकता आहे. गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. झोपड्या नसताना झोपड्या दाखवून ‘टीडीआर’ काढला जातो. अशा तक्रारी आल्या आहेत. त्यात तथ्य किती हे शोधले पाहिजे. दूषित पाणीपुरवठा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था यावर काम केले जाईल. शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास केला जाईल. भोसरी विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी भागाला अतिक्रमणाचा विळखा असल्याच्या तक्रारी येत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते अतिक्रमण काढले जाईल.’

‘रेड झोनच्या मोजणीचा नकाशा प्रसिद्ध करण्यासह शहरातील विविध प्रश्न सोडविले जातील. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली होऊन नवीन आयुक्त येण्याची दाट शक्यता आहे. नवीन आयुक्तांसोबत चर्चा करून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील,’ असेही पवार म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


dainik maval jahirat

Previous Post

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

Next Post

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.