Dainik Maval News : मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे गावखेड्यातील ओढे, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर शहरी भागात नाल्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तास पावसाचा जोर असाचा कायम राहण्याचा अंदाज आहे. मावळ तालुका हा घाटमाथ्यावरील भाग असून डोंगर दऱ्यांचा विभाग आहे. यामुळे तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोणावळा शहरात 221 मि.मी. पाऊस
गुरुवारी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहर परिसरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यातील अन्य भागांपेक्षा लोणावळ्यात सध्या सर्वाधिक पाऊस होत आहेत, यासह लोणावळा शहरात चालू वर्षाचा पाऊस 1166 मि.मी. अर्थात 45.1 इंच इतका नोंदविण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat