व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. ( Maruti Chitampalli Passes Away )

मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय 93) यांचे बुधवारी (दि. 18 जून) सोलापूरमध्ये रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले. गेली अनेक वर्षांपासून ते त्यांच्मया मूळ गावी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पुतण्या श्रीनिवास, भावजय आणि नातवंडे असा परिवार आहे.

30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चितमपल्ली ( Maruti Chitampalli ) यांना पद्मश्री ( Padmashri ) पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ह्या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून घरी परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर बुधवारी रात्री त्यांचे दुःखद निधन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी – निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ( CM Devendra Fadanvis ) त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला – ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar ) यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निसर्गाचा वाटाड्या गेला – पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्यऋषीला आपण मुकलो आहोत. निसर्गाची ओळख करून देणारा आपला वाटाड्या गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( DCM Eknath Shinde ) यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


dainik maval jahirat

Previous Post

PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात

Next Post

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Heavy rain in Lonavala As much as 233 mm of rain recorded in a single day

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.