राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. कोकणसह पुणे विभागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुचानांनूसार रायगड जिल्ह्यासाठी ( Raigad District ) दिनांक 9 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट ( Orange Alert ) जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये विजांच्या आणि ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी ( Heavy Rain Warning ) होण्याची शक्यता राहील.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#हवामान विषयक सूचना pic.twitter.com/UPHtxdKpll
— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) September 8, 2022
सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून आवश्यक मशिनरी आणि मनुष्य बळासह तात्काळ प्रतिसाद द्यावा. दरड प्रवण पूर प्रवण भागातील नागरिकांनी या काळात दक्ष राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, नगर पालिका कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांकडून देण्यात आला आहे. ( Heavy Rain Warning Orange Alert For Raigad District )
अधिक वाचा –
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
सुरेखा जाधवांच्या हस्ते लोणावळ्यात लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप तर महिलावर्गाला साडी भेट