Dainik Maval News : लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी (दि. 20 ऑगस्ट ) सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहर परिसरात 24 तासांत विक्रमी असा तब्बल 432 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुणे जिल्हा घाचट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. थंड हवेचे आणि वर्षा पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहर आणि परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. अशात दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने ठाण मांडले असून यामुळे परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात लोणावळा शहर हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना प्रशासनाने आज (20 ऑगस्ट) आणि उद्या (21 ऑगस्ट) रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच, नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच राहावे, सुरक्षित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी
