Dainik Maval News : मंगळवारी (दि.१७) असलेली अनंत चतुर्दशी आणि बुधवारी देण्यात आलेली ईद ए मिलाद सणाची सुटी या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूका संपेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) नवी मुंबई, ठाणे, मुंबई मध्ये प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सर्व चालक-मालक संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन यांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ या महामार्गावरुन नवी मुंबईमध्ये वरील कालावधीमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी असल्याने महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.
या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण अधिसुचना निर्गमित करण्यात आली असून सदर अधिसुचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र हद्दीत योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ( Heavy vehicle drivers should avoid traveling on Mumbai Pune highway During Ganapati Visarjan )
अधिक वाचा –
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे
– बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News