व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

Photo : Gurunath Sathelkar


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारपासून (दि. 7 एप्रिल) ते 9 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने द्रुतगती मार्गावर कडेला (शोल्डर लेन) थांबवण्यात येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनचालक, मालकांनी पुढील तीन दिवस सकाळी 6 ते दुपारी 12 या दरम्यान वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

उन्हाळी सुटी, तसेच गुढीपाडवा नूतन वर्ष यांमुळे अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. यात कोकणाकडे जाण्यात पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो. तसेच लोणावळा, खंडाळा परिसरात देखील मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. अशात अवजड वाहनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर ताण येतो अनेकदा वाहतूक कोंडी देखील होते. घाट क्षेत्रात ही वाहतूक कोंडी अधिक असते. तसेच ही अवजड वाहने घाटात बंद पडल्याने वाहनांच्या रांगा लागतात. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी नवा पर्याय अवलंबण्यात आला आहे. ( Heavy Vehicles Face Restrictions on Mumbai-Pune Expressway Until April 9 Due To Holiday Rush )

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला थांबवण्यात येणार आहेत. मोटारीसह हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मोटारींच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक बंद (ब्लॉक) ठेवण्यात येणार आहे. मुंबई मार्गिकेवरील वाहतूक खंडाळा बोगदा परिसरात थांबवून पुणे मार्गिकेवरील वाहतूक विरुद्ध दिशेने वळविण्यात येणार असून, वाहतूक सुरळित करण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे जड-अवजड वाहने बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलिस क्रेनच्या मदतीने वाहने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
– मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
– लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल


Previous Post

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar-Shrirang-Barne-Parth-Pawar

र...राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.