व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव यावर्षी 9 ते 12 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Dolasnath-Maharaj-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव यावर्षी 9 ते 12 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक,निकाली कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा तसेच मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन मारुती काकडे यांनी सांगितले. पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन डोळसनाथ महाराज उत्सव समिती व मंदिर नवनिर्माण समितीकडून करण्यात आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

मंगळवारी (दि. 9 एप्रिल) रोजी सकाळी श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक, दुपारी मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवलेल्या बैलगाडा स्पर्धा,सायंकाळी श्री डोळसनाथ महाराज यांची पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा, रात्री घोरावाडी स्टेशनाच्या मैदानावर कै.लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांचे आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे यांचा तंटा तिघींचा पण नवरा कुणाचा या नाट्याव्दारे लोकनाट्य तमाशा तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर श्री राम कला पथक मंडळ पवळेवाडी यांचे रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. ( Lot of programs organized on occasion of Shri Dolasnath Maharaj Festival at Talegaon Dabhade )

दुसऱ्या दिवशी दि.10 एप्रिल रोजी सकाळी लोकनाट्य तमाशाची हजेरी तसेच गणपती माळ येथे दुसऱ्या दिवशीच्या बैलगाडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच यात्रेकरूंची भांडाराच्या रूपाने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री 8 वाजता मारुती मंदिर चौकात डीपी रोडवर बारा गावांच्या बारा अप्सरा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. 11 रोजी सायंकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत भोई आळी मळा येथील मैदानात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण 7 लाख 6 हजार 777 रुपया पर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा,शिव प्रतिमाआदि रोख बक्षिसे ठेवण्यात आली असून याचे निवेदन पै. हंगेश्वर धायगुडे करणार आहेत.

दि. 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत लावण्यवती चंद्रा आर्केट्राचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. मावळ तालुक्यामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला हा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव असतो. तरी डोळसनाथ महाराज उत्सव समिती, व मंदिर नवनिर्माण समिती यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
– लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल
– भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी श्रीरंग बारणे यांचा विजय महत्वाचा’ – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून 'या' वेळेत अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.