Dainik Maval News : टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – जांभूळ गावाजवळील रेल्वे भुयारी मार्ग जवळील हाईट गेजला मालवाहतूक करणाऱ्या एका अवजड वाहनाची (कंटेनरची) धडक बसल्याने सदर हाईट वेट गेज वाकला असून रस्त्यावर कोसळला, यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हाईट वेट गेज खांब कोसळल्याने चार चाकी वाहनांना येथून ये-जा करता येणे शक्य नसल्याने चारचाकी वाहनांना वळसा घालून कान्हे फाटा मार्गावरुन काहीकाळ वाहतूक वळविण्यात आली होती. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख राजु खांडभोर यांनी रेल्वे प्रशासनाला संपर्क करुन कोसळलेला खांब तात्काळ हाटवि बाबत सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, भुयारी मार्गातून जास्त उंचीची वाहने जाऊ नये म्हणून हाईट वेट गेज खांब रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात आले आहेत. परंतु अनेकदा अवजड वाहन चालक येथूनच वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. यातून असे अपघात घडतात, व सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime