Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील मोरवे ग्रामपंचायत अंतर्गत कोळे चापेसर येथील विहित कागदपत्रांची पूर्तता झालेल्या 7 आदिवासी समाजबांधवांना ‘शबरी घरकुल योजना अंतर्गत’ भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने जिओ टॅग फॉर्म भरून घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यामुळे लवकरच या आदिवासी समाजबांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा मार्फत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येते.
रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने या योजनेचा लाभ मावळ मधील 7 आदिवासी समाजाच्या कुटुंबाला होणार आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत मोर्वे उपसरपंच प्रवीण गोणते, येळसे उपसरपंच निलेश ठाकर, आदिवासी प्रमुख गणेश वाल्हेकर, अंकुश जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
– ‘मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…’, अखेर त्या चर्चांना आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पूर्णविराम । MLA Sunil Shelke
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke