तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या खात्यातून पाऊणे दोन कोटी रुपये चुकीच्या बँक खात्यात जमा झालेच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी जिल्हाधिकारी आणि मावळ-मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चुकीच्या बँक खाते क्रमांकामुळे जी रक्कम ठेकेदाराला जाणे अपेक्षित होती, ते पावणे दोन कोटी रुपये महावितरणच्या खात्यात जमा झाले. हा सारा भोंगळ कारभार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत घडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर गलथान कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे कृती समितीचे मिलिंद अच्युत यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तळेगाव दाभाडे पोलीसांकडे केली आहे. दरम्यान महावितरणकडे नगरपरिषदेने रक्कम परत मिळावी यासाठी अर्ज केला आहे. अर्ज मिळाल्यानंतर रक्कम परत मिळण्यासाठी प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. ( high level inquiry demands talegaon dabhade nagar parishad money transfer case )
प्रकरण काय?
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात येणाऱ्या रकमेचा आरटीजीएस ॲप्लीकेशन फॉर्म वर अकाउंट नंबर चुकीचा लिहिल्याने शासनाची पर्यायाने जनतेच्या टॅक्स स्वरूपातील रकमेची हेळसांड झाली. सुमारे 1 कोटी 49 लाख 39 हजार 279 रुपये आणि 21 लाख 14 हजार 726 इतकी रक्कम हलगर्जी पणामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमावर्ग झाली.
मिलिंद अच्युत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रक्कम कचरा ठेकेदाराला न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. हा सर्व प्रकार गंभीर असून नगरपरिषदेचे प्रमुख या नात्याने मुख्याधिकारी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने नजर चुकीने घडला आहे किंवा त्यामागे काही खोडसाळपणाचा उद्देश आहे? याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मिलिंद अच्युत यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई