Dainik Maval News : महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र शासन कटिबद्ध राहील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करीत आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले. तसेच त्याबद्दल विधानसभेत विविध मुद्दे स्पष्ट केले. देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले आशिष शेलार…
आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषता पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. कारण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे.
सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की, आपण जे वेगवेगळे देखावे करतात त्यामध्ये आपले सैन्य, सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा