कान्हे : “विणेकरी हा दिंडीचा आत्मा आहे. त्यांचा सन्मान करणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला. वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे,” असे मनोगत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी व्यक्त केले. मावळ तालुक्यातुन पंढरपूर पायी वारी करणाऱ्या दिंड्यांमधील विणेकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री विठ्ठल परिवार मावळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील विणेकऱ्यांचा व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पायी चालणाऱ्या महिला-भगिनींचा सन्मान कान्हे येथे बुधवार (दिनांक 7 जून) रोजी करण्यात आला. ( honoring Dindi Warkari who way on Ashadhi Wari 2023 Kanhe Village Maval )
“माझी जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी या उक्तीप्रमाणे पंढरीची वारी आली की वारकऱ्याला वारीचे वेध लागतात. लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत ग्यानबा-तुकारामाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही शेकडो वर्षांची परंपरा जपण्याचे काम मावळ तालुक्यातील वारकरी आजही करीत आहेत.” त्यांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’, शरद पवारांना सोशल मीडियावर धमकी, राष्ट्रवादी आक्रमक
यावेळी उद्योजक शंकरराव शेळके, पोटोबा देवस्थान विश्वस्त सोपान म्हाळसकर, हभप सुखदेव ठाकर, हभप संतोष काळोखे, हभप सुखदेव ठाकर, हभप मुकुंद नाना राऊत, हभप छबू महाराज कडू, हभप रोहिदास महाराज धनवे, मधुकर वाघोले, सरपंच विजय सातकर, युवक अध्यक्ष किशोर सातकर, दिनेश सातकर, तुकाराम गायकवाड, विठोबा येवले, नारायणराव ठाकर तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. श्री विठ्ठल परिवार मावळचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी स्वागत केले. तर, आभार दिलीप खेंगरे यांनी मानले.
अधिक वाचा –
– दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड
– कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी संदीप दळवी बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष