Dainik Maval News : अखिल भारतीय वारकरी मंडळ, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान आणि विठ्ठल परिवार मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि. १५ जून) रोजी सकाळी 10 वाजता, श्री पोटोबा मंदिरामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर कडे पायी जाणाऱ्या दिंडीतील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यामध्ये तुळसीधारक महिला भगिनी यांना साडी चोळी, सन्मानचिन्ह आणि विनेकरी यांना पोशाख देऊन सन्मानित करण्यात येणार असून प्रत्येक दिंडीला विना दिली जाणार आहे. या सोबत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चा पंधरावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळाही संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, मंगल महाराज जगताप, नितीन महाराज काकडे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे, तुषार महाराज दळवी, हभप नंदकुमार भसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वारकरी मंडळ अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे पाटील, श्री पोटोबा देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे, श्री विठ्ठल परिवार अध्यक्ष गणेश महाराज जांभळे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News

