Dainik Maval News : कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेल मध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
पुणे शहरात अनेक ठिकाणी, विशेषतः महाविद्यालय परिसरात हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवली जातात. त्या ठिकाणी हूक्काच्या नावाखाली ड्रग्स, गांजा, तसेच अमली पदार्थ मुलांना दिले जातात त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे.
- पुण्यात अनेक ठिकाणी ही प्रकार सुरू असून अशा हुक्का पार्लरला कोरेगाव पार्क तसेच परिसरात परवानगी दिली आहे का? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी 20118 मध्ये कायदा करण्यात आला. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा आहे.
मात्र, आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास ६ महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान