व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढे शाळेतील विद्यार्थिनी गायत्री कारके ‘जवाहर नवोदय’ परीक्षेत यशस्वी । Maval News

मावळ तालुक्‍यातील आढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी गायत्री गणपत कारके हिने खुल्या प्रवर्गातून नवोदय परीक्षेत यश मिळवले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2025
in लोकल, ग्रामीण
Gayatri Karke student from Aadhe School Maval succeeded in Jawahar Navodaya exam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्‍यातील आढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी गायत्री गणपत कारके हिने खुल्या प्रवर्गातून नवोदय परीक्षेत यश मिळवले आहे. मावळ तालुक्यातील मुलींमध्ये गायत्री ही एकमेव विद्यार्थिनी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेली आहे.

जिल्ह्यातून 80 विद्यार्थ्यांची निवड
जवाहर नवोदय या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. आढे शाळेतील इयत्ता पाचवीच्या सतरा विद्यार्थ्यापेकी अकरा विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. यामधून कु. गायत्री गणपत कारके हिची नवोदय साठी निवड झाली आहे. मुलींमध्ये प्रथम मान मिळवून नवोदयसाठी एकमेव मुलगी पात्र ठरली आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप येथे निवड झाली आहे.

गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक
आढे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी अतिशय उत्तम असून शिष्यवृत्ती परीक्षेतही दरवर्षी शाळेचा निकाल चांगला असतो. तसेच, नवोदय परीक्षेत गतवर्षी शाळेचा एक विद्यार्थी शुभम निलेश सुतार पात्र ठरला होता. त्यामुळे गुणवत्तेचा उत्तम दर्जा ठेवणाऱ्या आढे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.

ज्यादा तास व सराव ठरला फायदेशीर
परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक अमित सारडा यांनी योग्य नियोजन करून जादा तास व प्रश्नपत्रिकेचे सराव घेतले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आरती दळवी व सहकारी शिक्षक केंद्राचे केंद्रप्रमुख बनकर सर, विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मावळ तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवरंग सुतार, उपाध्यक्ष तसेच हे सरपंच सुनीता सुतार यांनी गायत्री गणपत कारके हिचे कौतुक केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक : शेतकरी विकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक : शेतकरी विकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.